Ad will apear here
Next
पत्रकार संरक्षण कायद्याबाबत कोल्हापुरात शनिवारी जागृती शिबिर
कोल्हापूर : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेला कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, १० जून रोजी पत्रकार संरक्षण कायदा जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता शाहू स्मारक भवन येथे हे शिबिर होणार आहे.

राज्यभरातील सर्व वृत्तपत्रे, साप्ताहिके, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, उपसंपादक, छायाचित्रकार, कॅमेरामन यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकताच पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला आहे. या कायद्यासाठी पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती गेली काही वर्षे लढा देत होती. मराठी पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या लढ्याला यश आले आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची सविस्तर माहिती देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली या कायद्यासाठी लढा उभारला गेला, ते मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक या कायद्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराला ‘मुंबई भाजप’चे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव समीर देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पत्रकार, छायाचित्रकार, उपसंपादक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, कॅमेरामन यांनी या शिबिराला उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष चारुदत्त जोशी व रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी केले आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZRABD
Similar Posts
‘स्वयंसिद्धा’चा रौप्यमहोत्सव कोल्हापूर : स्वयंप्रेरिका महिला औद्योगिक संस्था, स्वयंसिद्धा आणि व्ही. टी. पाटील फाउंडेशन या तिन्ही संस्था एकत्रितपणे ‘स्वयंसिद्धा’चा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करणार आहेत. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्यांना त्या निमित्ताने गौरवण्यात येणार आहे.   राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री
‘स्वयंसेवी संस्थांनी शेतकऱ्याचे उत्पादन बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी करावे’ कोल्हापूर : ‘कर्जमाफीने शेतकरी कर्जमुक्त अथवा सुखी होणार नाही. पुन्हा तो कर्जबाजारी होईल. त्यामुळे कर्जमाफीपेक्षाही त्याने पिकविलेल्या उत्पादनास योग्य हमीभाव मिळायला हवा. त्यामुळे ‘स्वयंप्रेरिका’सारख्या स्वयंसेवी संस्थांनी शेतकऱ्याचे उत्पादन बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी करावे,’ असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले
‘स्वयंसिद्धा’चा रौप्यमहोत्सव कोल्हापूर : स्वयंप्रेरिका महिला औद्योगिक संस्था, स्वयंसिद्धा आणि व्ही. टी. पाटील फाउंडेशन या तिन्ही संस्था एकत्रितपणे ‘स्वयंसिद्धा’चा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करणार आहेत. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्यांना त्या निमित्ताने गौरवण्यात येणार आहे. राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री
‘भागीरथी’तर्फे मोफत हेल्मेट वाटप कोल्हापूर : ‘समाजासाठी योग्य भूमिका घेऊन आणि सामाजिक बांधिलकीचे भान राखून भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून राबवलेला मोफत हेल्मेट वाटपाचा उपक्रम दिशादर्शक आणि आदर्शवत आहे. लोकप्रियतेसाठी अनाठायी विरोध करण्याऐवजी समाजासाठी उपयुक्त असलेल्या विषयांना हात घालत स्वखर्चाने काम करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language